पाटेगावच्या पुलाला धोका नाही : अभियंता शेळके

Foto
पैठण, (प्रतिनिधी)  : नाथ सागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात सुमारे तीन लाख सहा हजार पाचशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.हे पुराचे पाणी गोदावरी नदीवर पैठण शेवगाव मार्गावर बांधण्यात आलेल्या पुलावर जवळपास तिन फूट उंची वरून प्रचंड वेगाने वहात होते.

 त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तसेच बीड जिल्ह्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला होता तसेच पूर्ण वाहतूक रविवार पासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे  पैठण शेवगाव कडे जाणारी शेकडो वाहने पैठणच्या व शेवगाच्या हद्दीत रोडवर अडकून पडलीहोती.जागोजागी पुलाचे लोखंडी कठडे पूर्णपणे तुटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले काही जमिनीवर लटकले उभे असलेल्या कठड्यावर मोठ्या प्रमाणात वेडेबाभळीच्या काट्या, गवत अडकले होते.

 तसेच पुलावर सर्वत्र माती जमा झाली होती.मंगळवारी पुराचे पाणी कमी झाल्याने वाहतुकीसाठी बंद असलेल्या या पाटेगाव जवळ असलेल्या पुलाची पाहणी पाटबंधारे विभागाचे उप अभियंता धनराज शेळके, उप अभियंता राजेंद्र बोरकर, शाखा योगीराज चव्हाण, चौडिया आदींनी पुलावर जाऊन पुलाची पाहणी केली. पुलाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे अभियंता धनराज शेळके व बोरकर यांनी सांगितले. दरम्यान पुलावर साचलेली माती जेसीबीच्या साह्याने काढण्यात येत आहे तसेच लोखंडी खात्यावर अडकलेली गवत काट्या काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते दरम्यान दुपारनंतर पुल वाहतूकुसाठी खुला करण्यात आला असे पैठण सार्वजनिक बांधकाम विभागाचे  उप अभियंता शेळके यांनी सांगितले.